समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन

पंढरपूर(प्रतिनिधी) 
पंढरपूर मधील प्रसिद्ध असलेले समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांचा वाढदिवस नेहमी चर्चेत असतो.वाढदिवस चा वायफळ खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असते.ऊद्या ११ नोव्हेंबर समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती येथे भाविकांना ऑक्सीपल्स मीटर,शुगर मशीन,प्रथमउपचार पेटी व मेडीकल साहित्य वाटप.पंढरपूर येथील  फैजाने अब्दुल सत्तार मदरसतुल मदिना मदरसा,मठवस्ती व दारुल उलम सुफिया मदरसा टाकळी रोड येथे लहान मुलांसाठी मोफत संपूर्ण हेल्थ चेकअप डाॅ करीम साहेब व डाॅ विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चेकअप होणार आहेत.गरीब व गरजु लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधे वाटप संपन्न होणार आहेत.पंढरपूर येथील लेबर काॅलनी झोपडपट्टीतील महिलांना मोफत सॅनीटरी पॅड समाजसेविका ऐश्वर्या शिंगटे व सकाळ यिन केंद्रीय कॅबिनेट स्री प्रतिष्ठा समिती अध्यक्ष सारीका वाडदेकर यांच्या हस्ते वाटप होणार आहेत.
तसेच गरीब व गरजु लहान मुलांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे एनर्जी ड्रिंक चे वाटप. गरजु व्यक्तिसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान करणे ही मानवतेच्या हिताचे कार्य करण्याची मानवाला मिळालेली एक अमूल्य संधी आहे.सध्या रक्तदान हे काळाची गरज बनले आहे.रक्तदान हे क्षेष्ठ दान आहे त्यामुळे समाजसेवक मुजम्मील कमलीवाले हे रक्तदान आपल्या वाढदिवसानिमित्त करणार आहेत.आपला मराठी बाणा न्युज च्या माध्यमातून समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.आपणास चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो व आपल्या हातून अशाच प्रकारची सेवा घडत राहो हीच प्रार्थना....!!!!

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form