चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्री १.०५ ते २.१५ या कालावधीत देवी सोवळ्यात राहणार
तुळजापूर प्रतिनिधी ---
महाराष्ट्राची आराध्य दैवत कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मंदीराचे पोर्णिमेचे धार्मिक विधी दिनांक २९ रविवारी रोजी संपन्न होणार आहेत. दरम्यान, चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्री १.०५ ते २.१५ या कालावधीत देवी सोवळ्यात राहणार असून या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानने पौर्णिमेचे विधी रविवारी होणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
मंदिर संस्थानने जाहिर केलेल्या धार्मिक विधीनुसार, शनिवारी (दि. २८) रोजीची प्रक्षाळ पूजा रात्री ११ ते ११-३०, रात्री ११.३० ते १२ मंदिर बंद- रविवारी (दि. २९) पहाटे १२ ते १२.५ श्री देविजींचा कडी दरवाजा उघडणे १२.५ ते १२.८,
चरणतिर्थ, १२-०८ ते १२-१० घाट देणे व पुजेस हाक- १२-१० ते १२-१५ श्रीपुजारी श्री देविजीं जवळ येणे व निर्माल्य विसर्जन,
१२-२५ ते १२-३५ देविजींची मंचकावरुन सिंहासनावर प्रतिष्ठापना १२-४५ ते १२-५५ धार्मिक विधी (पालखीवाले), १२-५५ ते १०० शुध्द स्नान, १-०५ ते १०२-२५ देव सोवळ्यात ठेवणे, २-२५ ते ४-३० वाजेपर्यंत पंचामृत स्नान, शुध्द स्नान, आरती, धुपारती, मेन बसविणे आदी विधी. श्री देविजींची नित्याची सकाळची पूजा सकाळी ६ वाजता, श्री देविजींची सायंकाळची पूजा आरंभ ७ वाजता, सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह छबिन्याची मिरवणूक व जोगवा रात्री ११ वाजता होणार आहे.
Tags
धार्मिक वार्ता