मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही
मगरवाडी / प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथे काल सकल मराठा समाज्याच्या वतीने मगरवाडी ग्रामपंचायत समोर येऊन छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एक मराठा लाख मराठा ,कोन म्हणत देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,मनोज जरागे-पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अश्या घोषणेने ग्रामपंचायत परिसर दणाणून गेला त्याच बरोबर राञी मराठा समाजा बरोबर अनेक समाजातील शेकडो तरुणांनी कॅडल मार्च काढण्यात आला.
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदीचे आव्हाण केले आहे.त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मगरवाडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने व मगरवाडी ग्रामपंचायतीकडून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत सर्व राजकीय पक्षांचे नेते पुढारी यांना गावात येण्यास व राजकीय सभा घेण्यास बंदी करण्यात आली आहे.
मगरवाडी ग्रामपंचायतीकडून मासिक सभेत ठराव करून पंढरपूर तहसील कार्यालय व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन यांना देण्यात आला आहे.
मराठा समाजाकडून पंढरपूर-मोहोळ रोडवरील मगरवाडी पाटी व पंढरपूर-तेर्हे मार्गे सोलापूर रोडवर तारापूर नाला येथे प्रवेश बंदीचे फलक लावून राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंद केला आहे.
संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या गंभीर झालेला दिसत आहे मराठा समाजाला लवकरात लवकर ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा समाज संपूर्ण राज्यभर आक्रमक झालेला आहे.या सोबतच या समाजाकडून अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदीही करण्यात आलेली आहे.सोलापूर जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात अनेक ग्रामीण भागात गेले अनेक दिवसांपासून मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आलेली आहे.जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा निर्धार तालुक्यातील मराठा समाज बांधवानी घेतला आहे शासनाचा निषेध करण्यासाठी तसेच मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील सर्व समाज बांधव मराठा समाजाच्या बरोबर आहे.
मगरवाडी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी,माजी सैनिक सकल मराठा समाज व इतर समाज ही बरोबर होता यावेळी प्रास्ताविक पाटील सर, पवार सर यांनी केले.
Tags
आंदोलन वार्ता