श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित नवरात्र संगीत महोत्सवाला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार हजेरी लावणार

१६ ऑक्टोबर ते २२ऑक्टोंबर सात दिवस पंढरपूरकरना मिळणार संगीत मेजवानी 
पंढरपूर प्रतिनिधी ---
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सव सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड  सर्वं सन्मानीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत असलेल्या संगीत महोत्सव दिनांक १६ ऑक्टोंबर ते २२ ऑक्टोबर या दरम्यान श्री संत तुकाराम भवन येथे रात्री ठीक ७:३०वा.संपन्न होणार आहे
दिनांक १६ ऑक्टोबर सोमवार रोजी ललीत मेऊंडी(हुबळी) आणि श्रीपाद लिंबेकर (नांदेड)यांचे , तिर्थ विठ्ठल १७ ऑक्टोबर मंगळवार रोजी सांस्कृतिक कला निकेतन कथ्थकरंग भुसावळ येथील ४० कलाकारांच्या समवेत,१८ ऑक्टोबर बुधवार रोजी प्रथम सत्र पं.शौनक अभिषेकी (पुणे)यांचे शास्त्रीय उपशास्त्रीय अभंग गायन द्वितीय सत्र ओम बोंगाणे यांचे गायन १९ऑक्टोंबर गुरुवार रोजी सत्यजीत तळवलकर (मुंबई)यांचे स्वतंत्र तबलावादन आणि ख्यातनाम  गायिका सायली तळवलकर (मुंबई)यांचे गायन होणार असून २०ऑक्टोंबर शुक्रवार रोजी ख्यातनाम गायक विनायक हेगडे (धारवाड)आणि ख्यातनाम गायिका सानिया पाटणकर (पुणे) यांचे भक्ती संगीत सादर होणार आहे २१ऑक्टोंबर शनिवार रोजी इंडियन आयडॉल विजेती अंजली नंदिनी गायकवाड  (पुणे)यांचा "बोलावा विठ्ठल" हा कार्यक्रम संपन्न होणार असून २२ ऑक्टोबर रविवारी नटराज क्लासेस यांचे भरतनाट्यम आणि सुशील कुलकर्णी निर्मित"मैफिल सप्तसुरांची" हा स्थानिक कलाकार यांच्या कार्यक्रमाने नवरात्र संगीत महोत्सवाची सांगता  होणार आहे.या सर्व कार्यक्रमाला सुभाष कामत,आशय कुलकर्णी,प्रसाद करंबेळकर,ओंकार इंगवले,उदय कुलकर्णी,अंगद गायकवाड,यश खडके,स्वानंद कुलकर्णी,अक्षय तळेकर,विश्वेश्वर जोशी,वैभव जोशी, कौस्तुभ तळेकर,अथर्व देव,वैभव केंगार,सागर कोकतरे,ज्ञानेश्वर दुधाणे आदी कलाकार साथसंगत करणार आहेत.

पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कलारसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात येत आहे.नवरात्री संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी अधिकारी  परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form