एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थ्यांनी बास्केट बॉल बुद्धिबळ, हर्डलस, ह्यामर थ्रो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला

पंढरपूर प्रतिनिधी --
नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय बास्केटबॉल , बुद्धिबळ, हर्डलस, ह्यामर थ्रो स्पर्धेत १९ वर्षा खालील मुलांच्या  स्पर्धेत एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी संघाने प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. 
विजयी संघ व सहभागी विद्यार्थी बास्केटबॉल संघ विनित जंगले, ऋषिकेश सरगर,यश शेळके,सागर शिंदे,राणा भोसले,देवेश ढोमणे,संस्कार मतेकर,विश्वजीत भोसले,हर्ष उत्तरवार, प्रेमराज गायकवाड,वरुण भोसले,  वेदांत फडतरे,बुद्धिबळ स्पर्धे अथर्व रोंगे प्रथम क्रमांक,हर्डलस या क्रिडा प्रकारात सागर शिंदे- प्रथम क्रमांक,गोळा फेकमध्ये सागर शिंदे तृतीय क्रमांक, ह्यामर थ्रो या क्रिडा प्रकारात ऋषिकेश साळुंखे प्रथम क्रमांक, अथलेटीकमध्ये ओम खत्री, द्वितीय क्रमांक ४०० व १५०० मिटर,रिलेमध्ये द्वितीय क्रमांक सागर शिंदे,ओम खत्री, ऋषिकेश सरगर, शिवराज पाटील यांनी विविध क्रीडा स्पर्धात विशेष यश संपादन केले आहे 

तसेच संघाची पुढील झोनल लेवल साठी निवड झाली आहे. विजयी संघाचे एमआयटीचे प्राचार्य  विरेंद्र बावस्कर यांनी अभिनंदन केले तसेच कॉलेजच्या  क्रीडा शिक्षिका  अस्मिता घोलप व शुभम तकिक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form