विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी मेहनतीने इच्छित ध्येय प्राप्त करावे --अमर पाटील

कोंढारकी येथील जि.प. शाळेमध्ये चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप
 
पंढरपूर प्रतिनिधी--
कोंढारकी येथील जिल्हा परिषद शाळेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या,पेन शालेय साहित्य वाटप करण्यात आले.       

या कार्यक्रमाप्रसंगी धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील उपस्थित होते.विठ्ठलकारखान्याचे संचालकअशोक घाडगे, प्रगतशील बागायतदार समाधान गायकवाड, हनुमंत मोरे ग्रामपंचायत सदस्य ,अतुल पाटील समाजसेवक, राम पाटील ,अज्ञान दांडगे, गणेश दांडगे,हनुमान पाटील, पुणे पोलीस सचिन मांजरे ,मुंबई पोलीस सागर पाटील गावातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते .
 
यावेळी विद्यार्थ्यांनी मोलाचे मार्गदर्शन करताना अमर पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांनी दररोज आई-वडिलांचा आशीर्वाद घेण्यास त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी मेहनतीने इच्छित ध्येय प्राप्त करावे, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन शैक्षणिक पाया मजबूत करावा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वबळावर भारतीय प्रशासकीय सेवेत भरती व्हावे असे त्यांनी आवाहन केले.                                    

यावेळी सूत्रसंचालन राजेंद्र फुगारे यांनी केले आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार शाळेतील दत्तात्रय शिखरे यांनी व्यक्त केले याप्रसंगी शिक्षक,शिक्षका व ग्रामस्थ मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form