पंढरपूर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारावे अशी निवेदनाद्वारे मागणी


पंढरपूर प्रतिनिधी ---
श्रीक्षेत्र पंढरपूर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारावे व त्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर करावा या मागणीचे निवेदन पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदासंघाचे आमदार मा.श्री.समाधान (दादा) आवताडे यांना सकल धनगर समाज पंढरपूर व तालुक्याच्या वतीने देण्यात आले. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या त्यामुळे त्या अखंड हिंदुस्तान चे प्रेरणा व अस्मिता आहे 
यामुळे भक्ती आणि शक्तीचे स्वरूप पहायला मिळेल त्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारावे व त्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर करावा या मागणीचे निवेदन पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदासंघाचे आमदार मा.श्री.समाधान (दादा) आवताडे यांना सकल धनगर समाज पंढरपूर व तालुक्याच्या वतीने देण्यात आले. यावेळी सोमनाथ ढोणे, नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, राहुल गावडे, रा.स.प.नेते पंकज देवकते, प्रशांत घोडके, पै.गोरख पांढरे, दादा कोळेकर, नितिन काळे, महेश येडगे, संतोष बंडगर, पांडूरंग वाडेकर, भास्कर जगताप इ मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form