सदर तक्रारीवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल आणि या भागात खंडित दूषित आणि अपुरा आसलेला पाणीपुरवठा सुरळीत होईल --- उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर
पंढरपूरकरांवर भीषण पाणी टंचाईची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पंढरपूर शहरात एकदिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे..मात्र पंढरपूर शहरातील मटन मार्केट परिसर, जुनी पेठ परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे या भागातील महिलांनी थेट मुख्याधिकारी यांचे दालन गाठत त्याठिकाणी ठिय्या मांडला.
अनुउपस्थित असल्याने सदर महिलांनी उपमुख्याधिकरी सुनील वाळूजकर यांच्याकडे जाऊन आपले त्या ठिकाणी ठिय्या मांडला. नगरपालिकेच्या वतीने केला जाणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होत असल्यामुळे नळापर्यंत पाणी येत नाही केवळ पाच ते दहा मिनिटात पाणीपुरवठा होतो. त्यातूनही दूषित आणि गाळ मिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी यावेळी उपस्थित महिलांनी उप मुख्यअधिकारी सुनील वाळुजकर यांच्याकडे मांडल्या आहेत.
यावेळी जवळपास २५ ते ३९ महिला उप मुख्याधिकारी सुनील वाळूस्कर यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून होत्या. यावेळी उपस्थित महिला भगीनींनी या भागात होणारा पाणीपुरवठा एक दिवसा आडच करा मात्र सुरळीत आणि व्यवस्थित नियोजनबद्ध करावा, आमचा प्रभाग सोडून इतर प्रभागात दोन वेळा पाणी येते व ते पाणी भरपूर स्वरूपात असते , तर आमच्या भागात पाणी कमी प्रमाणात येत असून केवळ दहा ते पंधरा मिनिट पाणी येते तसेच आलेले पाणी हे दूषित आणि गढूळ असल्याने असल्याने अनेक नागरिकांना गँस्ट्रो , कॉलरा , कावीळ सारखे आजार होण्याची दाट शक्यता आहे. दूषित पाण्यामुळे या भागातील अनेक लहान मुले, वयोवृध्द नागरिक, यांना सर्दी, खोकला, जुलाब, उलटी, या सारखे आजार होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांचे आरोग्यहितजपणे हे प्रशासकाचे कर्तव्य आहे नागरिकांना चांगल्या प्रतीचे आरोग्यदायी पाण्याचा पुरवठा करणे हे नगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ यावर योग्य त्या उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ व उत्तम दर्जाचे पिण्याचे पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असे आवाहन देखील यावेळी या महिला भगिनींनी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्याकडे केले आहे
यावेळी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी या भागातील महिलांशी संवाद साधत नागरिकांना पिण्याचे पाणी योग्य प्रकारे पुरवठा करण्याची हमी दिली. राज्यात असलेल्या भीषण पाणीटंचाई बाबत देखील त्यांनी महिलांना पटवून सांगितले त्याचबरोबर भविष्यात पाण्याचे नियोजन कसे केले जाणार आहे हे देखील सांगितले. दरम्यान त्यांनी तात्काळ नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांना सदर ठिकाणी भेट देऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देखील दिले असून सदर तक्रारीवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल आणि या भागात खंडित दूषित आणि अपुरा आसलेला पाणीपुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन देखील उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी यावेळी दिली आहे
Tags
प्रशासन वार्ता