पंढरपूर येथे ध्वनिप्रदूषण मुक्त गणेश उत्सव

पोलिस प्रशासनाने केले नेटकं नियोजन
 सर्व स्तरातून होत आहे कौतुक 

पंढरपूर प्रतिनिधी-- (प्रकाश इंगोले)
पंढरपूर शहर गणेश उत्सव 2023 हा डीजे व डॉल्बी ध्वनी प्रदूषण मुक्त व शांततेत पार पडला गणेश उत्सव ध्वनी प्रदूषण मुक्त पार पडण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी गणपती उत्सवात आपले कर्तव्य पार  पाडले. 
पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी ध्वनी प्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस अधीक्षक सरदेशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती. 

या पथकात पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक  नितीन जगताप पो.शि स्वप्निल पवार तसेच सरकारी पंच म्हणून  नागटिळक व  वंजारी यांनी काम पाहिले. 
वरील सर्वांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पडल्याने यंदाचा गणेशोत्सव हा ध्वनी प्रदूषण मुक्त व शांततेत साजरा झाला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form