लोकसभा निवडणूकीसाठीमनसेची तयारी

सोलापूर प्रतिनिधी --
येणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या तयारीला सर्वानी लागावे असे आवाहन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
    मनसेच्या सोन्या मारुतीचौक येथील कार्यालयामध्ये पंढरपूर,मंगळवेढा, अक्कलकोट,मोहोळ, सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य,सोलापूर शहर दक्षिण तालुकायासहा विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकघेण्यात आली.येणाऱ्या सोलापूर लोकसभा
मतदारसंघाच्या निवडणुकीच्याअनुषंगाने पूर्वतयारीसाठी याचे आयोजन करण्यात आले.
   यावेळीबोलताना दिलीप धोत्रे म्हणाले,
महाराष्ट्रातील जनता सत्ताधारीआणि विरोधी महाविकास आघाडीयांच्यावर संताप व्यक्त करत असून,जनता फक्त मनसेचे अध्यक्ष राजठाकरे यांच्याकडे विश्वासाने बघतआहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, लोकसभाअध्यक्ष प्रशांत इंगळे, व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form