मा.आ.प्रशांतमालक परिचारक यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने लोकमान्य विद्यालयात शालेय दफ्तर व पाणी बॉटल वाटप

राजूभाई सत्तारमेकर व बाळासाहेब कौलवार यांचे तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर व पाणी बॉटल
पंढरपूर प्रतिनिधी --
मा.आ.प्रशांतमालक परिचारक यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने लोकमान्य विद्यालयात राजूभाई सत्तारमेकर व
बाळासाहेब कौलवार यांचे तर्फे शालेय दफ्तर व पाणी बॉटल वाटप यटोपियन शुगर्सचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक यांचे हस्ते करण्यात आले .
या कार्यक्रमास  मा.नगराध्यक्ष नागेशजीभोसले,लक्ष्मणभाऊ शिरसट, मर्चंट बॅंकेचे चेअरमन सोमनाथजी डोंबे, अर्बन बँकेचे चेअरमन सतिशजी मुळे,हरिष ताठे,शिवाजी कोळी,निलराज डोंबे,मुन्नागिर गोसावी, श्री‌अहमद भडाळे, हाजीसादिक बेद्रेकर,जनाब सलिम शेख,रशीद करमाळकर,सनी मुजावर,नितीन गांधी, विठ्ठल कटकमवार, राजू जोजारे,प्रताप चव्हाण, धीरज म्हमाणे, कौस्तुभ गुंडेवार, भाऊसाहेब शिंदे, युवराज मुचलंबे, संदिप माने आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. 
यावेळी मान्यवरांचे स्वागत विद्यालयचे मुख्याध्यापक अभय आराध्ये यांनी तर मान्यवरांचे सत्कार राजूभाई सत्तार व बाळासाहेब कौलवार यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईस्माईल पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय मिसाळ यांनी केले .तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख मनोज बोधले यांनी मानले.
यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर-कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form