आ.आवताडे यांच्या प्रयत्नातुन १ कोटीचा निधी मंजूर
पंढरपूर येथील जिजाऊ स्मारक आणि जिजाऊ सृष्टी उभारण्यासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून यासंदर्भात हे स्मारक कसे असावे याबाबत एक बैठक आ.समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिजामाता उद्यान येथे गुरुवारी सायंकाळी झाली.
यामध्ये माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले,न. पा. मुख्याधिकारी अरविंद माळी,प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, उपमुख्यधिकारी सुनील वाळूजकर, विनोद लटके,दीपक वादडेकर,किरण घाडगे,नितीन शेळके,शंकर सुरवसे,राधेश बादलेपाटील,
संदीप मांडवे, अर्जुन चव्हाण, दिलीप कोरके आदीसह सर्व पक्षीय नेते व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी मान्यंवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.समाधानआवताडे म्हणाले, पंढरपुरात जिजाऊ स्मारक आणि जिजाऊ सृष्टी निर्माण होत आहे, ही एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम आहे.तसेच पंढरपूर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.यासाठी आपल्याकडे १कोटी निधी आला आहे.चांगल्या,जाणकार आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करण्यात यावा, लवकरात लवकर याचे संकल्प चित्र तयार होणे गरजेचे आहे.असे आमदार समाधान आवताडे म्हणाले.
याप्रसंगी स्मारक हे कसे असावे याबाबत माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, दीपक वाडदेकर , किरण घाडगे, संदीप मांडवे, नितीन शेळके, विनोद लटके यांनी आपली मात व्यक्त केले तसेच विविध सूचना केल्या.यावेळी आ.आवताडे यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांना विविध सूचना केल्या.
Tags
सामाजिक वार्ता