गरजवंत मराठ्यांसाठी लढा.....
पंढरपूर प्रतिनिधी ---
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्हा येथील मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असतानाच आत्ता पंढरपूर येथे छत्रपती सेवक गणेश जाधव या युवकाने येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलनाचा भडका उडाला आहे. यामध्ये गाव बंद आंदोलन, रस्ता रोको , निषेध मोर्चा अशा विविध प्रकारचे आक्रमक आंदोलने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहेत हि आंदोलने नियंत्रित करताना प्रशासन व पोलिसांची दमछाक होत आहे.
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील गणेश जाधव हा तरुण सकल मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर आज शुक्रवार दि. ८ रोजी आमरण उपोषणास बसला आहे. याबाबत त्यांनी दि. ६ रोजी त्यांनी तसे प्रशासनास निवेदन देऊ केले आहे.
##आरक्षण मिळेपर्यंत उपोषण....##
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी तहसील कार्यालयासमोर आपण आमरण उपोषणाला बसलो असून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण उपोषणावर ठाम राहणार आहे.
गणेश जाधव
उपोषणकर्ता, पंढरपूर
Tags
आंदोलन वार्ता