महावितरण कार्यालय पंढरपूर ग्रामीण-2 च्या लोकसेवकावर लाच लुचपत विभागाची कारवाई

पंढरपूर प्रतिनिधी ---
दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी सहाय्यक लेखापाल वर्ग-3, महावितरण कार्यालय
पंढरपूर ग्रामीण-२जिल्हा,सोलापूर येथील लोकसेवक श्रीकांत भीमराव आवाड यांना रुपये ५०००/- ची लाच घेताना रंगेहाथ पकडले.यानंतर त्यांच्या वर  लाचलुचप विभागा तर्फे कारवाई करण्यात आली.

 याबाबत तक्रारदार यांचे किराणा मालाचे दुकान आहे. नमूद दुकानांमध्ये नवीन वीज मीटर घेण्याकरिता तसेच तक्रारदार यांनी शेजारचा दुकानातून लाईट कनेक्शन घेतले म्हणून त्याच्यावर ७०००/- रू चा दंड आकारलेला आहे असे सांगून तो दंड माफ करण्याकरिता यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीस १५०००/- रुपयाची मागणी करून तडजोडी अंती ५०००/- रुपयाची लाचेची मागणी करून, ५०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे कबूल करून, ती लाच रक्कम महावितरण कार्यालय पंढरपूर ग्रामीण-2 या कार्यालयाच्या आवारात स्वीकारले असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 
याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. सापळा पथक,पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पो.शि. रियाज शेख, पो.शि. दिनेश माने,पो. शि मंगेश कांबळे चालक पो.हवा दिवेकर, ला.प्र.वि. पुणे यांनी कारवाई केली असून याबाबत मार्गदर्शन अधिकारी म्हणून अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र. 
श्रीमती शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.यांनी काम पाहिले आहे.

सर्व नागरिकांना कळवण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन नितिन जाधव.पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form