खेड भोसे विद्यालय खेड भोसे येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

खेड भोसे विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये मिळवले घवघवीत यश 

पंढरपूर प्रतिनिधी ---
पंढरपूर येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खेड भोसे विद्यालया तर्फे खेड भोसे येथे  केले होते . या कुस्ती स्पर्धेसाठी तालुक्यातील अनेक पैलवान सहभाग झाले होते .२३ / ०८/२०२४ ते २४/८/ २०२३ या दोन दिवसात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. 

या स्पर्धेच्या उद्घाटन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित (आबा) पाटील यांनी केले यावेळी पंढरपूर तालुक्याचे युवा नेते  गणेश(दादा) पाटील, समाधान (दादा)काळे , अमरजित पाटील,  तुकाराम मस्के सर  विविध संस्थेचे अध्यक्ष, सदस्य , खेड भोसे ग्रामपंचायतीचे आजी, माजी सदस्य  ग्रामस्थ मान्यवर मंडळी उपस्थित होते. 
खेड भोसे विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये खेड भोसे विद्यालयाला घवघवीत यश मिळाले असून १४ वर्षे मुले व १७ वर्षे मुले प्रथम क्रमांक तर १७ वर्ष मुलीने द्वितीय क्रमांक मिळवून तालुक्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली आहे.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष , सचिव , शाळेचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा कार्यालय, तालुक्यातील आमचे सर्व शिक्षक मित्र , भैरवनाथ आखाड्याचे सर्व वस्ताद यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे तर कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी प्रा महादेव तळेकर सर यांनी रायगड लॉन्स उपलब्ध करून दिले .यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव तानाजीराव पवार मुख्याध्यापक कुंडलिक पवार क्रीडा मार्गदर्शक, शिक्षकभारत झांबरे 
विलास आदमीले यांनी कुस्ती स्पर्धेतील सर्व यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form