सामाजिक भान ठेवून पुढच्या पिढीस दिला आदर्शवत संदेश
प्रतिनिधी पंढरपूर
वाढिदवस म्हटलं कि अफाट खर्च , डिजेवरील मोठ्या आवाजातील नाचगाणे व पार्ट्या असा माहोल सध्या सर्वत्र पहावयास मिळतो. परंतु यातून कोणतेही सामाजिक भान जोपासले जात नसून उलट याचा समाजाला त्रासच होतो. त्यामुळे याच गोष्टींना फाटा देवून विहीर फोडकाम करणार्या मजूरांसमवेत आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करून गणेश भोसले यांनी मजूरांचा आणि कुटूंबीयांचा आनंद व्दिगुणीत केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील गणेश भोसले यांचे चिरंजीव समर्थ याचा वाढदिवस विहीरीचे फोडकाम करणार्या मजूरांसमरोत साजरा करण्यात आला. यामुळे मोठ्या कष्टाचे काम करणार्या मजूरांनाही वाढदिवसाचा आनंद आनुभवता आला. यावेळी माजी संचालक विलासराव भोसले, रविंद्र भोसले,उमेश भोसले, गणेश भोसले, बापूसाहेब भोसले यांच्या मजूरवर्ग उपस्थित होता. यावेळी मजूरांना मिष्ठान्न भोजन वाटप करण्यात आले.
गतवर्षी समर्थ याचा वाढदिवस मुकबधीर विद्यार्थ्यांसमवेत साजरा करून त्यांनाही मिष्ठान्न भोजन वाटप करण्याचे सामाजिक कर्तव्य भोसले परिवाराने जोपासले होते. तर यंदा या मजूरांसमरोत वाढदिवस साजरा करून त्यांच्या कष्टमय जीवनातील काही क्षण तरी आनंदाने व्दिगुणीत केले आहेत. समाजातील सर्वच घटकांना आनंदाचे चार क्षण द्यावेत हीच भुमिका समाजातील इतरांही घ्यावी असा मोलाचा संदेश यातून व्यक्त होत आहे
Tags
सामाजिक