पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळु चोरी करणा-या विरूध्द कारवाई

१७, २४, ०००/- रू किमतीचा मुदेमाला हस्तगत 
पंढरपूर प्रतिनिधी --
दि ०६/०८/२०२३ रोजी पहाटे ०५/०० वाजण्याचे सुमारस मौजे चिंचोली भोसे ता. पंढरपूर भिमा नदी पात्रातुन अवैधरित्या वाळु चोरी होत असल्याची माहिती मिळाल्याने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे पथकाने सदर ठिकाणी छापा घालुन ०३ ट्रक्टर वाहन, डंपीगट्रॉली ०३ ब्रास वाळुसह आरोपी  धनाजी रामकृष्ण पवार, अनिल लक्ष्मण पवार, गणेश बापु सोनवणे तिघे रा. चिंचोली भोसे,  राजु चंद्रकांत शिकतोडे रा. गुरसाळे यांचे विरूध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुरनं ५५४ / २०२३ भा द वि क ३७९, ३४ गौण खनिज कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक  क्षिरसागर हे करीत आहेत.

दिनांक ०८/०८/२०२३ रोजी रात्रौ १०.४० वा. सुमारास गोपनिय बातमीदार यांचेमार्फत माहिती की, मौजे शेगाव दुमाला येथील भिमा नदी पात्रातुन पिकअपच्या सहायाने अवैधरित्या वाळु चोरी होत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील बिट अंमलदार यांनी छापा टाकुन ०१ पिकअप वाहन ०१ ब्रास वाळुसह अज्ञात अरोपी विरूध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुरनं ५६२ / २०२३ भादविक ३७९, ३४ गौण खनिज कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवलदार घंटे हे करीत आहेत. असा एकुण दोन्ही गुन्हयात एकुण १७, २४, ०००/- रू किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला

सदरची कामगिरी ही  अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग,मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शन खाली पो का,शिवशंकर हुलजंती, पो कॉ राहुल लोंढे, पो कॉ मुजावर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे पथक तसेच पो हे कॉ इसाक सय्यद, पो ना विनायक क्षीरसागर, पो काँ बालाजी कदम पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form