पंढरपूर शहर व तालुक्यात जनावरांचा लंपी रोगाबाबत शिवक्रांती संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन

पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर शहर व तालुक्यात जनावरांचा लंपी रोग थैमान घालत आहे त्याबाबत शिवक्रांती संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले अनेक मुके जनावरे दगावले आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .
    एक तर आलो व सुका दुष्काळांमुळे शेतकरी हा होरपळून निघत आहे त्यात लंपी रोग हा अजून अडचणीत आणण्याचे काम करत आहे  प्रशासन, पशुवैद्यकीय अधिकारी व सरकारी डॉक्टर याकडे दुर्लक्ष करत आहेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्यांना खाजगी डॉक्टर कडे जावा असा सल्ला देण्यात येत आहे .
  यामुळे  तहसीलदार साहेबांना भेटून यावर लवकरात लवकर उपयोजना करावी असे शिवक्रांती संघटनेकडून निवेदन देण्यात आले व त्याची लवकर अंमलबजावणी व्हावी असे सांगण्यात आले व तहसीलदार साहेबांनी सुद्धा लगेच तातडीची बैठक बोलावून ह्या विषयाची गांभीर्याने दखल घेतली आहे.
    लवकरात लवकर जर या रोग आटोक्यात आणला नाही किंवा लवकरात लवकर जर शेतकऱ्यांना मदत केली नाही तर लंपी रोगाने बाधित झालेले मुक्या जनावरे आम्ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे ऑफिसमध्ये आणून बांधून व तसेच पुढल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांचे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर आंदोलन करु असे संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला.

यावेळी  शिवश्री दत्तात्रय काळे संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती युवा संघटन महाराष्ट्र राज्य तसेच शहराध्यक्ष माऊली चव्हाण शहर सचिव ,मंगेश श्रीखंडे तालुका संपर्कप्रमुख ,अण्णा भोसले आदी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form