श्री अभिजीत (आबा) पाटील साहेब यांचे ४० व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

 बाभुळगांव येथील मुकबधीर शाळेतील   विद्यार्थ्यांना स्नेह भोजन व वृक्षारोपण     कार्यक्रम संपन्न
पंढरपूर, प्रतिनिधी---
: श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीतआबा पाटील साहेब यांच्या ४० व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कारखाना येथे सर्व रोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर असे विविध समाजपयोगी कार्यक्रम राबवुन साजरा करणेत येत आहे. त्यामध्ये आज दिनांक ०४.०८.२०२३ रोजी श्री नागनाथ मूक बधीर शाळा, बाभुळगांव येथील विदयार्थ्यांना स्नेह भोजन देण्यात आले.

 तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रम कारखान्याचे संचालक श्री जनक भोसले यांचे अध्यक्षतेखाली व कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक व स्वागत पर भाषणामध्ये बोलताना मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक श्री मधुकर भोसले म्हणाले की, आपण मागील वर्षापासुन कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीतआबा पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन येथील विदयार्थ्यांना स्नेहभोजन देण्याचा उपक्रम राबवित आहात. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. या निष्पाप बालकांकडुन आबांचे वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड म्हणाले की, अभिजीत आबा पाटील यांनी आपल्या कार्याची सुरुवात २०१७ पासुन केली आहे. त्यांच्या रुपाने आपल्याला धडाडीचे नेतृत्व लाभले आहे. त्यांचे हातुन असेच गोरगरीब जनतेसाठी समाजपयोगी कार्य घडावे व त्यांची वरचेवर प्रगती व्हावी अशा भावना व्यक्त केल्या.

सदर कार्यक्रमास शिवप्रेमी दुध संकलन या संस्थेचे चेअरमन गणेश गांडुळे, तेजस इंग्लिश मिडीयम बाभुळगांवचे संस्थापक श्री महेश कथले, विशाल भोसले, रोकडे, मुकबधीर विदयालयाचे सर्व स्टाफ व कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुकबधीर विदयालयाचे श्री खडतरे सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form