पंढरपूर प्रतिनिधी ---
तालुक्यातील ग्रामपंचायत मुंढेवाडी नगरीच्या माजी सरपंच मा.सौ.शितलताई संतोष मोरे व समस्त ग्रामस्थ मुंढेवाडी यांच्या कल्पकतेने आणि सद्भावनेने नागपंचमी सणानिमित्त मुंढेवाडी येथे आयोजित "हळदी कुंकू व महिला खेळ" कार्यक्रमांसाठी महिला नेत्या मा.सौ.अंजलीताई समाधान आवताडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या माता-भगिनींना विविध मनोरंजनात्मक खेळांचे दर्शन घडावे या भावनेने आयोजकांनी उपस्थित महिला - भगिनींना अतिशय स्तुत्य कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सौ.अंजिलीताई आवताडे यांनी आयोजकांचे अभिनंदन करुन कौतुक केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,महिलांचा उत्साह आणि प्रचंड उपस्थितीत पाहून भारावून गेलो. महिला एकत्रित येऊन सामाजिक उपक्रम राबवून महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी राजकीय व सामाजिक कार्यक्षेत्रातील अनेक महिला मान्यवर व माता-भगिनी आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags
सामाजिक