अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये पंढरीच्या रेल्वे स्टेशनचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिनांक ६ रोजी योजनेचे ऑनलाईन उद्घाटन होणार
पंढरपूर प्रतिनिधी ---
अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये पंढरीच्या रेल्वे स्टेशनचा समावेश ! वारकरी भाविक भक्त व पर्यटकांच्या सोयीसाठी पंढरपूर रेल्वे स्थानक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने  व विविध सुविधांनी  युक्त होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिनांक ६ रोजी योजनेचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.
पंढरपूर रेल्वे स्टेशनचे नवीन रुप कसं असणार याची झलक दर्शविणारी ही संकल्पचित्र
पंढरपूर ही दक्षिणगकाशी म्हणून ओळखली जाते याकरता रेल्वे स्थानकाच्या अमृत भारत योजनेत समावेश करत असताना शुभारंभाच्या वेळी पंढरपूर मुंबई दररोज रेल गाडी सोडण्यात यावी तसेच कुर्डूवाडी ते मिरज व पंढरपूर सांगली कोल्हापूर याही गाड्या चालू करण्याबाबत विचार केला जावा अशी भाविकातून चर्चा आहे. रेल्वेने आजही हजारो भाविक सामान्य नागरिक विठ्ठलाच्या दर्शनास येतात रेल्वे विभागाने विचार करून काही नवीन गाड्यांचा समावेश तातडीने करण्याची गरज आहे असे मत पंढरपूर येथील भाविकांनी, नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form