छत्रपती शाहु सेनेच्या तालुका अध्यक्षपदी लक्ष्मी टाकळीचे सोमनाथ खपाले

पंढरपूर प्रतिनिधी ---
 छत्रपती शाहु संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर व शहर अनेक उपक्रम राबविले जातात तसेच अन्याय,अत्याचार यावर वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या वतीने करत असल्याचे सेना प्रमुख प्रताप भाऊ कांबळे यांनी सांगितले.तसेच टाकळी येथील सोमनाथ खपाले यांची पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी शिवाजी मोरे मराठा महासंघाचे तालुका कार्याध्यक्ष यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार छत्रपती शाहु संघटनेच्या वतीने करण्यात आला. तर पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी सोमनाथ खपाले यांची निवड झाल्याबद्दल मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी मोरे  यांनी सत्कार त्यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना सोमनाथ खपाले म्हणाले की छत्रपती शाहु सेनेच्या माध्यमातून गोरगरीब, अन्याय अत्याचार पिडीत, नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. तर गावपातळीवर सामाजिक, शैक्षणिक  उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. सोमनाथ खपाले यांची निवड झाल्याबद्दल सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
सदर कार्यक्रमास सुरेश टिकोरे,सोमनाथ कोळी,समाधान ढोणे,गणेश जगदाळे,संतोष ढोणे, अतुल मोरे, अमोल मोरे,छत्रपती शाहु संघटनेचे पदाधिकारी व लक्ष्मी टाकळी येथील  ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form