अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस उत्साहात केला साजरा
पंढरपूर प्रतिनिधी---
पंढरपूर तालुक्याचे नेते आणि धाराशिव साखर कारखाना युनिट१,२,३ चे चेअरमन श्री. अभिजीत धनंजय पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, भव्य आरोग्य तपासणी शिबीर, अन्नदान, गरजू लोकांना किराणा कीट वाटप, वृक्षारोपण, कोवीड योद्धाचा सन्मान असे अनेकानेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान व वृक्षारोपण विविध सामाजिक उपक्रम आदी कार्यक्रमामुळे पंढरपूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेले युवा नेते म्हणून चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वावर परजिल्ह्यात जाऊन यशस्वी तीन साखर कारखाने चालवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात आहे. आज १ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिराची कुरोली, नांदोरे, देगाव, पंढरपूर या आदी गावात तसेच धाराशिव कारखाना युनिट १, २, ३ मध्ये ५०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच पळशी, पटवर्धन कुरोली, शेळवे, देगाव, शेळवे,अनवली, फुलचिंचोली आदी गावात हजारो वृक्षांचे रोपण करण्यात आले. 
मंगळवेढा येथेे वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत
महाआरोग्य तपासणी शिबीर रायगड लॉन्स भोसे येथे अयोजीत करण्यात आले 
पंढरपूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात देखील अभिजीत पाटील यांचा मोठा प्रभाव आहे.  त्यांच्यावरील प्रेमापोटी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात अन्नदान तर देवडे येथे धान्यवाटप करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form