वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनात पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा सहभाग.
वाराणसी ( श्री क्षेत्र काशी)येथेआंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि एक्स्पो वाराणसी ITCX 23.हे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन झाले असून यामध्ये पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह भ प शिवाजी मोरे,आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके हे उपस्थित होते.
या तीन दिवसीय अधिवेशनात विविध विषयांवर तज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय मंदिर महाकुंभ मेळाव्यामध्ये विशेष उपस्थिती आणि सहभाग घेण्यासंदर्भात .गिरीश कुलकर्णी, संस्थापक (टेंपल कनेक्ट) यांच्या निमंत्रणानुसार सदर अधिवेशनामध्ये श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचा सहभाग नोंदविण्यास मंदिर समितीच्या दि. १ मे रोजीच्या सभेत मान्यता देण्यात आली होती.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प.श्री.शिवाजीराव मोरे व कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी अधिवेशनात सहभाग नोंदविला आहे.
मंदिराचे प्रशासन अधिक सर्वोत्तम कसे करता येईल आणि भक्तांना अशा तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाचा अनुभव अधिक उत्तम प्रकारे उपलब्ध करून देता येईल अशा विविध संकल्पना राबविण्यासाठी सदरचे अधिवेशन वाराणसी येथील रुद्राक्ष भवन या ठिकाणी या आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष मा.आ.प्रसाद लाड होते.
पहिल्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा.श्री.मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. दुस-या दिवशी ह भ प औसेकर महाराज यांनी वारी, वारकरी, पंढरीचे महात्म व श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे महत्व व धार्मिक परंपरा या विषयी अधिवेशनात माहिती दिली व मार्गदर्शन केले. तद्नंतर कार्यकारी अधिकारी यांनी मंदिर समिती मार्फत देण्यात येणा-या भाविकांच्या सोई सुविधांबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले.*
या पहिल्या कन्व्हेन्शन आणि एक्स्पोमध्ये जगभरातील ३२पेक्षा अधिक देशांमधील ४५० पेक्षा अधिक मंदिर व्यवस्थापन मंडळे आणि त्याचे प्रमुख पदाधिकारी ऑनलाईन पध्दतीने / समक्ष सहभागी आहेत. या ३दिवसीय अधिवेशनात मंदिर व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून आयोजित केलेली खास आणि परस्परसंवादी माहितीची देवाणघेवाण करणारी सत्रे, पॅनेलवरील तज्ञांशी चर्चा, मंदिर व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ आणि तसेच ह्या क्षेत्रातील अग्रगण्य अनुभवी केस स्टडीचे सादरीकरणे तसेच देशातील पुरातन मंदिरांच्या व्यवस्थापन मंडळांची उपस्थिती लाभल्याने त्याचा निश्चितच मंदिर समितीच्या विविध विकासात्मक कामात व भाविकांना अत्याधुनिक सोई सुविधा देण्यास फायदा होणार असल्याचे श्री.औसेकर महाराज यांनी सांगीतले.
Tags
धार्मिक