सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 167 व्या जयंतीनिमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने टेंभूत वसंत भोसले, सम्राट फडणीस, बाळासाहेब आंबेकर आदिंचा सन्मान करण्यात आला.
सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 167 व्या जयंतीनिमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार 2023 या राज्यस्तरीय पुरस्काराने महाराष्ट्रातील पत्रकार तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आगरकरांचे जन्मगाव टेंभू (ता. कराड) येथे सिक्कीमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेंभूच्या सुधारक शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील होते. यावेळी तहसीलदार विजय पवार, उद्योजक रामकृष्ण वेताळ, टेंभूचे सरपंच युवराज भोईटे, इंद्रधनू फाऊंडेशनचे विश्वस्त नितीन ढापरे, विकास भोसले, माणिक डोंगरे, प्रमोद तोडकर, संदीप चेणगे, अशोक मोहने आदी मान्यवर उपस्थित होते.