करकंब येथे संभाजी भिडे गुरुजी यांचे आज व्याख्यानाचे आयोजन..‌‌..!

परम पवित्र भगवा ध्वज*या विषयावर व्याख्यानमाला
करकंब प्रतिनिधी:-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभाग यांच्या वतीने आज मंगळवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी दहा वाजता सुवर्ण गार्डन मंगल कार्यालय मोडनिंब रोड करकंब येथे संभाजी भिडे यांचे व्याख्यान आयोजित केले असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
       संभाजी भिडे गुरुजी की, ज्यांनी आपली हयात गडकोट किल्ल्यांच्या रक्षणासाठी घालवली, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भगव्याच्या छायेखाली लाखो तरुणांना एकत्र करुन प्रत्येक वर्षी गडकोट मोहीम गुरुजींच्या नेतृत्वाखाली संपन्न होते,या वयातही गुरुजींचे विचार ऐकण्यासाठी सगळी तरुणपिढी कानात प्राण आणून ऐकते,ज्यांचे स्वप्न आहे की रायगडावर 32मणाचे छत्रपती शिवरायांचे सोन्याचं आसन व्हावे, असे संभाजीराव भिडे गुरुजी यांची मंगळवार दि १८ जुलै २०२३ रोजी करकंब येथे जाहीर व्याख्यान होणार असून सर्व शिवपाईक,धारकरी,सर्व तरुण मंडळे, राजकीय पक्ष,सामाजिक संस्था,व्यापारी एक दिवस देव,देश,धर्मासाठी सर्वांनी गुरुजींचे विचार ऐकण्यासाठी आवर्जून यावे .या व्याख्यानातून "परम पवित्र भगवा ध्वज" या विषयावर आपले विचार मांडणार आहेत,या कार्यक्रमाचे स्थळ:  सुवर्ण गार्डन म़गल कार्यालय मोडनिंब रोड करकंब ता.पंढरपूर वेळ : मंगळवार दि १८ जुलै, सकाळी ठीक १०.०० वाजता आहे.
भगवा न‌ राष्ट्रध्वज हे, उरी शल्य दुःख |
करणार राष्ट्रध्वज ही, शिवआणभाक |दिल्लीवरी फडकवु ,भगव्या ध्वजाला |ओलांडू म्लेंच्छ वधण्या आंम्ही आटकेला 
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभाग यांच्या वतीने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form