अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

अजित याची प्रगती होवू दे विठ्ठलास साकडे 


पंढरपूर प्रतिनिधी --

मातृसुरक्षा दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. अजित याची प्रगती होवू दे, असे साकडे विठ्ठलास घातले असल्याची माहिती आशाताई पवार यांनी पत्रकारांना दिली.

   आषाढी यात्रेसाठी येताना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामती येथे आला होता. यावेळी पवार कुटूंबियांनी भाविकांची सेवा केली. त्याचे फळ म्हणून आषाढी एकादशी सोहळा झाल्यानंतर लगेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाले असे सांगून आशाताई पवार म्हणाल्या, अजितची प्रगती होत जावी म्हणून आपण विठ्ठलास साकडे घातले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form