पंढरपूर तालुक्यातील ९ कोतवाल पदाचे आरक्षण जाहीर

पंढरपूर प्रतिनिधी --
तालुक्यातील  रिक्त असलेल्या  कोतवाल पदांसाठी आरक्षण सोडत तहसील कार्यालय पंढरपूर  येथे ईश्वर चिठ्ठीपध्दतीने काढण्यात आले.  तालुक्यात  रिक्त असलेल् या 9 कोतवाल पदांपैकी 03 पदे महिलांसाठी आरक्षित झाली आहेत.
              
      यावेळी प्रांताधिकारी तथा कोतवाल भरती समिती अध्यक्ष गजानन गुरव, तहसिलदार तथा  कोतवाल भरती सदस्य समितीचे सचिव  सुशीलकुमार बेल्हेकर,  अपर तहसीलदार तुषार शिंदे, महसूल सहाय्यक आर आर शिंदे मंडलाधिकारी, तहसिल कार्यालयातील कर्मचारी, यांच्यासह संबधित गावचे तलाठी, ग्रामसेवक तसेच नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

 यामध्ये  गोपाळपूर अनुसूचित जमाती (ST),  आनवली  अनुसूचित जमाती (ST),  गुरसाळे - इतर मागास वर्ग OBC महिला, गादेगाव भटक्या जमाती ड-( NT-D) , गार्डीअनुसूचित जमाती(ST), बोहाळी - इतर मागास प्रवर्ग (Obc) महिला, कौठली - इतर मागास प्रवर्ग (Obc), नारायण चिंचोली- आर्थिक दुर्बल घटक(EWS ) , पटवर्धन कुरोली- अनुसूचित जमाती(ST) महिला, या कोतवाल पदासाठी  आरक्षण काढण्यात आले.

    दिनांक 24 ते  31 जुलै 2023 या कालावधीत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळत कोतवाल पदासाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. प्राप्त अर्जाची छाननी  दिनांक 2 ऑगस्ट रोजी  करण्यात येणार आहे.  कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी  100 गुणांची 50 प्रश्नांची लेखी बहुपर्यायी परिक्षा घेण्यात आहे. तसेच  दिनांक 9 ऑगस्ट रोजी निकाल प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form