राज्याला मिळाला दुसरा उपमुख्यमंत्री

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार 



अजित पवार यांच्यासह नऊ दिग्गज राजकीय नेत्यांचा शपथविधी संपन्न

मुंबई प्रतिनिधी---

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राजभवन येथे आज दुपारी झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.



यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे व अनिल पाटील यांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.


व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form