समाधान आवताडे यांची महत्त्वपूर्ण भुमिका

प्रशासनांशी समन्वय साधत आ. समाधान आवताडेंनी केले  आषाढी वारीचे सक्षम नियोजन





पंढरपूर --प्रतिनिधी 

आषाढी यात्रेनिमित  १० ते १२ लाख भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी  भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आरोग्य सुविधा यासह आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करावे, पालखी मार्ग, विसावे व मुक्कामांच्या तळाची पाहणी करावी, अशा सूचना त्यांनी वेळोवेळी केल्या होत्या कोणत्याही प्रकारची अडचण या काळात भाविकांना येणार नाही याची काळजी आ. समाधान आवताडे घेताना दिसून आले वारीचे योग्य नियोजन आणि प्रशासकिय अधिकार्यांशी समन्वय साधत यात्रा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न यशस्वीपणे पार पडली .

     पंढरपूर आषाढी वारी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक  पंढरीत येत असतात. आषाढी वारी व्यवस्थितपणे व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी यांचेशी सतत नियोजनाचा आढावा घेत तसेच समन्वय साधून हि यात्रा यशस्वी पार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

यंदाचे आषाढी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस अगोदर पंढरीत येऊन येथील कामाचा आढावा घेतला होता.

चौकट###
महाराष्ट्र तसेच बाहेरच्या राज्यातून भाविक वारीला येत असतात त्यांना कोणतीही असुविधा होऊ नये व पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीत आलेला वारकरी आनंदाने बारी पोचवून सुखरूप परतला पाहिजे ही भावना मनात ठेवून आम्ही काम केले प्रशासन व सर्व पक्षीय पदाधिकान्यांनी मनोभावे यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याने बिना व्यत्यय वारी पार पडली आहे.

समाधान आवताडे आमदार पंढरपूर मंगळवेढा###

 समाधान आवताडे यांनाही अधिकारी कार्यानी स्वतः लक्ष देऊन भाविकांना कसलीही अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेण्याची सुचना प्रशासकिय अधिकारी यांना केली होती. यानुसार आ. आवताडे यांनी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव आणि नामदेव टिळेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुनसिंह भोसले तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांचेशी सातत्याने संपर्क ठेवून होते.

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form