लायन्स क्लब पंढरपूरतर्फे गणेश रुग्णसेवा मंडळाच्या मुकबधीर व मतिमंद विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कडूलिंब,चिंच,करंज,पिंपळ,वड या ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांच्या रोपांचे रोपण करण्यात आले.या वृक्षांची रोपे ला.रा पा कटेकर यांच्या तर्फे देण्यात आली
यावेळी पर्यावरण रक्षण व वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या विषयी जागृती करणारे फलक हातात घेऊन विद्यार्थी ,शिक्षक व लायन्स सदस्य यांची रॅली काढण्यात आली.यावेळी विद्यार्थी घोषणा देत होते.*
या उपक्रमासाठी प्रशाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, ला.रा पा कटेकर,ला.विवेक परदेशी,ला.अध्यक्ष आरती बसवंती,सेक्रेटरी ला.ओंकार बसवंती,ट्रेझरर ला.शोभा गुप्ता व इतर सदस्य उपस्थित होते