मृदुंगाचार्य शंकर - वसंत फाऊंडेशन आयोजित पं गोविंद भिलारे स्मृती संगीत समारोह....

करकंब प्रतिनिधी:-
    पं गोविंद भिलारे हे संगीत क्षेत्रातील सर्व परिचित नाव. एक जिज्ञासू,अभ्यासू. व विचारवंत आणि एक उत्तम रचनाकार.
    त्यांनी पखवाजाचे प्राथमिक शिक्षण वडील पार्वती भिलारे तसेच दत्तोबा सूर्यवंशी व तुकाराम भुमकर यांच्या कडे घेतले.
        व पुढे शास्त्रीय पखवाजाचे शिक्षण  पुण्यातील नाना साहेब पानसे घराण्याचे प्रसिद्ध ज्येष्ठ पखावज वादक पं वसंतराव घोरपडकर यांच्या कडे झाले.तसेच तालयोगी पद्मश्री पं सुरेश तळवलकर  यांच्या कडे लय तालाचे शिक्षण घेतले.
     त्यांनी आपल्या गुरु पं वसंतराव घोरपडकर यांच्या स्मरणार्थ 2019 साली शंकर वसंत फाऊंडेशन ची स्थापना केली. ते पुणे महानगरपालिकेच्या शाळेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत  होते.  समारोहाला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच कोविड काळात पालिकेतर्फे  ठीकठिकाणी जाऊन जनसंपर्क आणि जनजागृतीच्या कामामध्ये  त्यांना संसर्ग झाला व 2 ऑगस्ट 2020 रोजी शेवटी कोविड जिंकला व ते स्वर्गवासी झाले.
    त्यांच्या पश्चात ही सर्व जवाबदारी भिलारे परिवार आणि शिष्य परिवार  समर्थपणे पुढे चालवत आहे.
           समारोहाचे या वर्षीचे 3 रे पुष्प 5 ऑगस्ट 2023 रोजी सायं 06 वाजता मुक्तांगण इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज चे ऑडीटोरियम,पर्वती पुणे येथे संपन्न होणार आहे.
   या महोत्सवात पहिल्या सत्रात  जगप्रसिद्ध संतूर वादक पं  शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ संतनू गोखले यांचे एकल संतूर वादन  होणार आहे. यांना तबला साथ कार्तिक स्वामी हे करतील.
   तर दुसऱ्या सत्रात पं गोविंद भिलारे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा पार पडेल. तदनंतर दिल्लीचे नाथद्वारा परंपरेचे ज्येष्ठ पखावज वादक संगीत नाटक अकादमी व तानसेन पुरस्कार प्राप्त ,पं डालचंड शर्मा यांचे  शास्त्रीय पखावजचे एकल वादन होणार आहे. यांना प्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री मिलिंद कुलकर्णी  लहरा साथ करतील तरी सर्व कलारसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिष्यपरिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
 सदर  या महोत्सवाला पुण्यातील नामवंत कलाकारांची उपस्थिती असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form