शिष्यवृत्ती परिक्षेत जयवंत बागल राज्यात दहावा


राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागातून मिळाले यश
पंढरपूर प्रतिनिधी --
खिलारवाडी विदयालय खिलारवाडी, तालुका पंढरपूर येथील विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत जयवंत बागल राज्यात १० वा.आला असल्याचे शाळेच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

   महाराष्ट्र राज्य  परिक्षा परिषद , पुणे 
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा  
इयत्ता ५ वी या परिक्षेत खिलारवाडी विद्यालयातील विजयसिंह रामचंद्र बागल यांचे चिरंजीव जयवंत विजयसिंह बागल यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागातून महाराष्ट्र राज्यात १० वा. क्रमांक पटकवला आहे. या परिक्षेत ९०.६६ % गुण मिळवुन यश संपादन केले आहे.

 या उज्वल यशाबद्दल शरदचंद्रजी पवार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक प्रा. सुखदेवराव चव्हाण सर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्याचे आईवडील ,खिलारवाडी गावातील सर्व ग्रामस्थ  या सर्वांच्या वतीने विदयार्थ्यांचे  अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form