महेश साठे यांच्या परिवाराच्या वतीने त्यांची स्वागत व सत्कार
पंढरपूर प्रतिनिधी --
मंगळवार दि. ११ जुलै रोजी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सौभाग्यवती लताताई एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस निमित्ताने त्या पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले असता मंदिर समितीच्या वतीने त्यांचा व कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ,प्रसाद,श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सौभाग्यवती लताताई एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस या निमित्ताने त्या महाराष्ट्राची कुलस्वामिनीआई तुळजाभवानी, अक्कलकोट श्री .स्वामी समर्थ महाराज व अखंड विश्वाचे माता पिता विठ्ठल रुक्मिणी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या आले होते .
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पंढरपूर येथील महेश साठे यांच्या परिवाराच्या वतीने त्यांची स्वागत व सत्कार करण्यात आला.