निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने एकाचा मृत्यू

पत्रे घेऊन जाणारे वाहन मध्येच थांबले; दुचाकीवरील युवकाच्या गळा चिरला
पंढरपूर प्रतिनिधी ---
पंढरपूर येथील अंबाबाई मंदिराजवळ असणाऱ्या नवीन पुलावर छोटा हत्ती टेम्पोमधील पन्हाळी पत्रा लागून गळा चिरल्याने सोलापूर येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना बुधवारी१२ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार आमिन दगडू शेख (वय ४०, रा. अंबिका नगर, बाळे, सोलापूर) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव असून पंढरपूर येथील नवीन पुलावरून दोघे जण जातं असताना हि घटना घडली तेअवेंजर मोटरसायकलवरून (एमएच १२-एक्यू ९८३५) मुजावर कय्युम (वय ४८, रा. सौंदणे, ता.मोहोळ) आणि आमिन दगडू शेख हे दोघेजण मोहोळहून पंढरपूरकडे येत होते. त्यांच्यापुढे एक मालवाहू छोटा हत्ती गाडीतून पत्रे वाहून नेले अचानक छोटा हत्ती टेम्पो थांबल्याने गाडीतून बाहेर आलेला पत्रा गळ्यात घुसल्याने गाडीवर मागे बसलेले
आमिन दगडू शेख यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकल चालवित असलेले कय्युम मुजावर हे अपघाताचा अंदाज येताच वाकल्याने ते बचावले, पण मागे बसलेले आमिन शेख यांना काय होत आहे, हे कळायच्या आत त्यांच्या गळ्यात पत्रा घुसला व ते मृत पावले. या प्रकरणी हयगयीने, रस्ता न बघता, निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून छोटा हत्ती टेम्पोचालक सुनील नागनाथ अभंगराव (वय २६, रा. सोलापूर नाका, पंढरपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स. पो. नि. सोनकांबळे तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form