श्री विठ्ठलाचे दर्शन घेताना जगद्गुरू शिवाचार्य महास्वामी, मंदिर अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, राजेंद्र शेळके यांच्यासह इतर.
पंढरपूर प्रतिनिधी --
श्री क्षेत्र काशी येथील जगद्गुरू यांनी अधिक मास प्रारंभाच्या निमित्ताने मंगळवार, १८ जुलै रोजी विठ्ठल व रुक्मिणीचे येथे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समिती अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर उपस्थित होते. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी शिवाचार्य महाराज यांचा शाल, श्रीफळ, श्रींची मूर्ती देऊन सत्कार केला.
Tags
धार्मिक