श्रीपाद क्लिनीक काणे हाॅस्पिटल तर्फे विठ्ठल भक्तांची मोफत आरोग्य तपासणी

 श्रीपाद क्लिनीक काणे हाॅस्पिटल तर्फे विठ्ठल भक्तांची मोफत आरोग्य तपासणी तर गायत्री मेडिकल तर्फे मोफत औषध वाटप


पंढरपूर --प्रतिनिधी 

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखों वारकरी, विठ्ठल भक्त पंढरपूर येथे मैलोनमैल  चालत येतात ,ऊन, वारा, पाऊस यांची कोणतीही तमा नबाळगत करता ते पायी चालतात .या भाविकांचे आरोग्य उत्तम राहवे तसेच सर्दी, खोकला, पडसे, ताप, अंगदुखी, आदी व्याधी वातावरण बदलामुळे होत असते.विठ्ठल भक्त, वारकरी, महिला वारकरी यांना डॉ.श्रीराज व डॉ. शर्वानी  काणे "श्रीपाद क्लिनिक " काणे हॉस्पिटल येथे दशमी व एकादशी सलग दोन दिवस वारकरी साठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले .

  


    तसेच गायत्री मेडिकल मधून औषधे  मोफत देण्यात आली. तसेच उत्तम आरोग्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर पंढरपुर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झालेल्या गोरख नाथ दिंडी मधील भक्तांना मोफत उपचार सेवा व औषधे दिण्यात आली या साठी अमित केसकर यांनी श्रमदानं दिले तर गायत्री मेडिकल यांच्या तर्फे मोफत औषध देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form