पंढरपूर --प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज २४ वर्षे पूर्ण करून २५व्या वर्षात पदार्पण करत आहे त्या *निमित्ताने २५ वा स्थापना दिवस *पंढरपूर मध्ये सरगम चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आज राष्ट्रवादी पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण माननीय श्री अभिजीत आबा पाटील चेअरमन श्री विठ्ठल सहकारी कारखाना वेणूनगर यांच्या हस्ते केला*
त्यानिमित्ताने देशाचे नेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत सदैव काम करणारी ज्येष्ठ कार्यकर्ते नागरिकांचा सत्कार श्री विठ्ठलाची मूर्ती, शाल, फेटा घालून अभिजीतआबा
पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी श्री प्रकाश पवार, श्रीजयंतराव साबळे, बाळासाहेब पाटील, अरुण पाटील, दिनकर दाजी चव्हाण या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.
आज दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून फळे वाटप, मिष्ठांन्न भोजनवाटप, ज्येष्ठांना वृद्धाश्रमामध्ये अन्नदान असे समाज उपयोगी विधायक कार्यक्रम राबवणार आहे. यावेळी जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष श्री सुभाष दादा भोसले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष संदीप दादा मांडवे, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई राऊत, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष श्रीधनंजय साठे सर, युवती महाराष्ट्र संघटक कुमारी चारुशिलाताई कुलकर्णी, कू. अमृता शेळके, विद्यार्थी चे जिल्हाध्यक्ष सागर पडगळ, ओबीसी चे शहराध्यक्ष अनिल सपताळ ,शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे सर ,आनंद कथले, विजय मोरे, योगेश साळुंखे, प्रवीण शिंदे सर,
प्रणव गायकवाड,सोमनाथ बनसोडे, सुनील मांडवे,रामभाऊ खडके, अविनाश मोरे यावेळी अनेक राष्ट्रवादी प्रेमी उपस्थित होते
