रायगडावर साजरा होणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा

 लोकोत्सव, धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची, "जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याचा इतिहासाचा," व 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा 'ठरणार मुख्य आकर्षण



पंढरपूर --प्रतिनिधी 
अखिल भारतीय शिवराज्य अभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा ५व६जून रोजी सोहळा समितीचे  मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थिती शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे.
दुर्गराजगडावर भव्यदिव्य  कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समिती सदस्य प्रा. महादेव तळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे माहिती देताना ते म्हणाले की, दिनू५ जून रोजी लोकोत्सव, तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची, “जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याचा इतिहास,” व 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र सह देश-विदेशातील शिवभक्त उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राची युद्धकला प्रात्यक्षिक कार्यक्रम होणार आहे महाराष्ट्रातील युद्ध कला आखाड्याचा यात सहभाग असून महाराष्ट्राचे पारंपारिक युद्ध केला याचे दर्शन गडावर होणार आहे यामध्ये पट्टा तलवार बाला विटा जमिया कटार माडू आदी शस्त्राचे विविध प्रकारेचे सादरीकरण होणार आहे 

राजदरबार येथे “जागर शिवशाहीरांचा. स्वराज्यांच्या इतिहासाची “हा शाहिरी कार्यक्रम होणार असून महाराष्ट्रीय नामवंत शाहीर यात सहभागी होणार आहेत.

त्याचबरोबर 6 जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्णांचा अभिषेक होणार आहे. “सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा ” या पालखी मिरवणुक महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आठरा आलुतेदार सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. आपल्या पारंपरिक लोक कलांचा मिरवणुकीत जागर होणार आहे. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असून या मार्गावरुन पालखीवर पुष्पवृष्टी केली जाईल तरी सर्व शिवभक्त सहभागी पारंपरिक वेषभुषेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 
   या पत्रकार परिषदेस समितीचे प्रशांत मलपे, एड. ज्ञानेश्वर मोरे, पांडुरंग सरवसे, दत्तात्रय जगताप, धनंजय तळेकर, उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form