वाढदिवसानिमित्त चळे येथे वृक्षारोपण

अभियंता प्रकाश पाटील व सहाय्यक अभियंता प्रशांत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त

      २५१ प्रकारची झाडे लावुन साजरा 



पंढरपूर --प्रतिनिधी 

आषाढी वारीच्या शुभदिनी महावितरण पंढरपुर ग्रा १ चे उपकार्यकारी अभियंता प्रकाश पाटील व सहाय्यक अभियंता प्रशांत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपनाचा कार्यक्रम महावितरण कार्यालय चळे येथे यशस्वीपणे करण्यात आला.

  


    येथे २५१ प्रकारच्या आंबा,पिंपळ,चिंच,बेल,उंबर ई प्रकारची झाडे लावण्यात आली. याप्रसंगी चळे गावचे सरपंच माउली शिखरे,युवराज गायकवाड, ग्रा.सदस्य ,आंबे गावचे संजय ताड .कल्याण कांबळे , अमोल गवळी , संतोष कोळी, पंकज सुतार, महेश घायाळ, माउली घाडगे,विजय करावे, माने गुरुजी , प्रताप गायकवाड  तसेच चळे येथील वृक्षमित्र राजेंद्र गाेवे यांच्या उपस्थित कार्यक्रम सपंन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form