सोनार समाज संघटना सोलापूरच्या वतीने दिल्या शुभेच्छा
सोलापूर प्रतिनिधी
अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे आयोजीत भरत नाट्यम समूह डान्स स्पर्धेत सहभागी होऊन सोलापूर ची सुवर्ण कन्या कुमारी दुर्गा उपळाईकर हिने पारितोषिक मिळविले आहे. कुमारी दुर्गाच्या यशाबद्दल आम्हांस अभिमान वाटतो . कु दुर्गा ही सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व सराफ श्री संजय उपळाईकर यांची कन्या आहे .यापूर्वी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्लासिकल डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे.
यावेळी सोनार समाज संघटना सोलापूरचे सर्वश्री वसंत पोतदार , विजयकुमार पोतदार , दत्तगुरु वेदपाठक , गजानन सोनार पंडीत , गिरीश जमखंडीकर , डॉ दीपक पोतदार , इंजि विजय पोतदार , इंजि आर एम दोडमनी , प्रा अमर दीक्षित , सतीश जेऊरकर , मोहन पोतदार , सुधीर धोत्रिकर आदी समाजातील मान्यवर मंडळीने तिचे हार्दिक अभिनंदन केलेेे व शुभेच्छा दिल्या.
