अभिजित पाटील यांच्या पॅनलला अॅड. दीपक पवार, अमरजीत पाटील यांचा पाठिंबा :
प्रतिनिधी पंढरपूर
सहकार शिरोमणी साखर कारखान्यात कर्जाचा डोंगर उभा केला आहे. सभासद कामगार यांची देणी थकीत आहेत. त्याचा परिणाम कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी लोकांच्या जिवनावर होत आहे. निवडणुकीत सभासद आमच्या गटाच्या पाठीमागे आहेत. सताधाऱ्यांच्या त्रासाला सभासद वर्ग वैतागला असल्याने यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास "विठ्ठलाचे चेअरमन अभिजित पाटील व्यक्त केला.
यावेळी अमरजीत पाटील म्हणाले की, वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी माजी आमदार कै. औदुंबर पाटील यांनी परिश्रम घेतले होते. त्याची एकसष्ठी पूर्ण झाल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या सन्मानपत्रात संस्थापक असा उल्लेख आहे. यावेळी बी. पी. रोंगे, दिनकर चव्हाण आदींनी मनोगते व्यक्त केली
कल्याणराव काळे यांचे जुने सहकारी त्यांची साथ सोडत आहेत. अभिजित पाटील. बी. पी. रोग यांच्या गटात सामील होत असल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. कल्याणराव काळे यांचे विरोधक अॅड. दीपक पवार तसेच अमरजीत पाटील यांनी अभिजित पाटील गटास समर्थकांसह पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी बी. पी. रोंगे, हणुमंत पवार दिनकर चव्हाण, महादेव तळेकर, काळे सीताराम रणदिवे आदी उपस्थित होते.
वसंतराव काळे साखर कारखान्यातील सभासदत्व रद्द करण्याचे पाप केले आहे. विठ्ठल परिवाराचा कळवळा घेऊन पदे टिकविण्याचे काम काळे यांनी केले आहे. परंतु त्यांचे कारखान्यातील अधिकार शाबूत ठेवले नाहीत. कारखान्याची अवस्था वाईट आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थित चालविण्यासाठी सभासद नवीन नेतृत्वाला संधी देतील.असे अभिजित पाटील म्हणाले
यावेळी बोलताना एडवोकेट दीपक पवार म्हणाले की 2016 पासून वसंतराव काळे साखर कारखान्याच्या नेतृत्व विरोधात माझे काम चालू आहे सभासदाचे हित अबाधित ठेवण्याचा लढा आजही सुरू आहे निवडणुकीत एकी नसल्याने सत्ताधारी गटाचा विजय झाला होता त्या चुका परत करायचे नाहीत वसंतराव काळे कारखान्याने सिताराम करण्याच्या सभासदासाठी सभासदांना विश्वासात न घेता उसभेतील पैसे कपात केली होती त्या लोकांना पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांना पैसे परत मिळाले आहेत अशा लोकांची संख्या जवळपास दोन हजार चारशे असून ते वसंतराव काळे कारखान्याचे सभासद असल्याचे पवार यांनी सांगितले.
