मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी असलेल्या ३५ गांवचा पाणी प्रश्न आपण लक्ष घालून सोडवावा,
बेरोजगारीचा प्रश्न मिटविणेसाठी पंढरपूर येथे एम आय डी सी होणे गरजेचे
पंढरपूर प्रतिनिधी--
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचा भूमिपूजन व शेतकरी मेळावा संपन्न झाला यावेळी कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील म्हणाले की, आपला कारखाना चालू करणेसाठी आ. श्री रोहितदादा पवार यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचे संचालक मंडळाच्या व सभासदांच्या वतीने आभार व्यक्त केले. तसेच पंढरपूर तालुक्याचे गतवैभव प्राप्त करणेसाठी हा कारखाना चालू करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार मानतो.
श्री शरद पवार साहेब यांचे विषयी बोलताना चेअरमन श्री अभिजीत पाटील म्हणाले की, २०१० मध्ये मी आपल्याला पहिल्यांदाच भेटलो तेंव्हापासून आपल्या व्यक्तीमत्वाचा माझ्यावर प्रभाव पडला व मी आपल्याकडे आकर्षित झालो, तसेच सदर प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, बायो सीएनजीचा प्रकल्प उभा केल्याने कारखान्यास आर्थिक फायदा होवून सर्व सभासद शेतकन्यांना जास्तीत जास्त ऊसास दर देता येईल, तसेच पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अडीअडचणी विषयी बोलताना म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यामध्ये एक मोठा उद्योग निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होवून पुणे-मुंबई येथे जाणान्या बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती होईल. तसेच कै. भारतनाना भालके यांचे स्वप्न असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी असलेल्या ३५ गांवचा पाणी प्रश्न आपण लक्ष घालून सोडवावा, अशी विनंती श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांना केली. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रामध्ये माझा खारीचा वाटा उचलेन अशी ग्वाही दिली. पंढरपूर तालुक्यातील अडीअडचणी विषय बोलताना म्हणाले की, तिर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये स्थानिक जनतेला विश्वासत घेवून आराखडा राबविणे गरजेचे आहे. तसेच राज्य शासनाने नमामी चंद्रभागा ही योजना जाहीर केलेली असूनसुध्दा चंद्रभागा नदीचे पात्र अजूनही दुषीत असल्याची खंत व्यक्त केली. पंढरपूर तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न मिटविणेसाठी पंढरपूर तालुक्यामध्ये एम. आय. डी. सी. होणे गरजेचे आहे. त्यासाठी कारखान्याची मालकीची ३६७ एकर जमीन असून त्यापैकी २५० एकर जमीन एम. आय. डी. सी. साठी देणेचा प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळाकडे देणेत आलेला असून त्याचा पाठपुरावा चालू आहे.
सदर प्रसंगी खासदार सर्वश्री ओमराजे निंबाळकर, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता उमेश पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

