अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर- विविध पदाधिकारी निवडी संपन्न...
पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथे ६ मे शनिवार रोजी अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मराठ्यांचे क्रांतीसुर्य मराठा आरक्षण जनक स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती व अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. विजय भैय्या घाडगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते
यावेळी प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय छावा संघटनेचे महिला आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सौ. महालक्ष्मी सगर उपस्थित होत्या त्याच बरोबर अखिल भारतीय छावा संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष गीतांजली कदम यांच्या हस्ते पंढरपूर शहर व तालुक्यातील महिला आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली यावेळी सांगोला तालुका अध्यक्षपदी मनीषा बिनवडे पंढरपूर शहराध्यक्ष पदी शुभांगी भिसे पंढरपूर शहर उपाध्यक्ष पदी अपर्णा लिमये तसेच पंढरपूर शहर संघटक पदी कांचन थोरात यांची निवड करण्यात आली तसेच नेत्र तपासणीचे १४७ पेशंट व मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे २७ पेशंटची नोंद झाली.
