गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सारखे हॉस्पिटल्स राज्यात व्हावेत.- छत्रपती शाहू महाराज

 अद्ययावत तंत्रद्यान आणि तसेच तज्ञ् डॉकटरच्या सेवा इथे उपलब्ध



पंढरपूर (प्रतिनिधी) येथील श्री काणे कुटुंबियांच्या तीन पिढ्या उत्कृष्ठ वैद्यकीय सेवा देत आहेत.हा व्यवसाय समाजाला खऱ्या अर्थाने उपयोगी पडणारा आहे, पुणे , मुंबई इथल्या सारखे अद्ययावत तंत्रद्यान आणि तसेच तज्ञ् डॉकटरच्या सेवा इथे उपलब्ध करून दिले असून गायत्री हॉस्पिटल सारखे हॉस्पिटल्स राज्यात व्हावेत असे प्रतिपादन कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू महाराज यांनी  केले.डॉ काणे'ज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे उद्घाटन प्रसंगी त्यांनी केले.

         यावेळी  मा.आ.श्री प्रशांत परिचारक, डॉ सुरेंद्र काणे, सौ डॉ वर्षा काणे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, प्रकाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, वसुधा काणे , अम्मा  देगलूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शाहू महाराज आणि मान्यवराच्या हस्ते सिटी स्कॅन , आयसीयु ऑपरेशन थिएटर आदी नवीन विभागांचे उद्घाटन करण्यात आले,या वेळी स्वागतपर भाषणात हॉस्पिटलचे डॉ सुरेंद्र काणे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.तसेच आमच्या हॉस्पिटल मध्ये पॅथॉलॉजी विभागात सर्व प्रकारचे अत्याधुनिक आणि तात्काळ तपासणी केली  जात आहे. तसेच अत्यवस्थ  रूग्णांना तात्काळ उपचारांसाठी मेडिकल , सर्जिकल आणि कार्डियाक  अतिदक्षता विभाग कार्यरत आहे.या हॉस्पटिल मध्ये एकूण ६ ऑपरेशन थिएटर आहेत. अशी माहिती प्रास्तविकात डॉ वर्षा काणे यांनी दिली.  
      पुढे बोलताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले, या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये वाजवी  खर्चात उपचार केले जाणार आहेत असे ते म्हणले. तर माजी आमदार श्री प्रशांत परिचारक म्हणाले,रुग्णाची श्रध्दा, विश्वास आपल्या डॉक्टर वर असला पाहिजे,तो विश्वास काणे कुटुंबीयांनी मिळविला आहे. श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, अशा हॉस्पिटलची गरज पंढरपूर सारख्या भागात आहे. तर राज्याचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी डॉ काणे कुटुंबीयांनी सुरु केलेली रुग्ण सेवा आणि  पुढे जाऊन उभे केलेल्या  सुपरस्पेशालिटि  हॉस्पिटलच्या माध्यमातून निश्चितच चांगली सेवा देतील असा संदेश त्यांनी दिला,यावेळी प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या.ज्येष्ठ पत्रकार श्री बाळासाहेब बडवे यांनी श्री विठ्ठलाचे आशीर्वाद तर श्री क्रांतिसिंह उत्पात यांनी श्री रुक्मिणी मातेचे आशीर्वाद दिले.या वेळी रुग्णालयात उपचार घेऊन  ठणठणीत झालेल्या आठ रुग्णांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्री मंदार केसकर,डॉ.सौ मैत्रेयी केसकर यांनी केले. आभार डॉ ऋतुराज काणे यांनी मानले  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीधर काणे, स्वानंदी काणे, डॉ श्रीराज काणे, डॉ शरवाणी काणे,डॉ अनिल पवार, डॉ धनराज काणे ,डॉ बसराज सुतार , डॉ भूषण पवार,  श्री विश्वास पाटील आणि हॉस्पटिल मधील सर्व ऎद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी  परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमास पंढरपूर शहरा व पंचक्रोशीतील हजारो लोक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form