नागेश भोसले प्रणित पंढरपूर मर्चंट बँक सहकारी विकास आघाडीचा दणदणीत विजय

पंढरपूर मर्चंट बँकेच्या निवडणुकीत नागेश भोसले  पॅनल  विजयी १५ पैकी १२ जागा  भोसले पॅनलकडे ः




पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होवून यामध्ये नागेश भोसले प्रिणत पंढरपूर मर्चंट बँक सहकारी विकास आघाडी  पॅनलने १५ पैकी १२ जागांवर विजय मिळवला असून विरोधी पॅनलाल फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. निकाल घोषीत झाल्यानंतर नागेश भोसले समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला.
   
     पंढरपूर मर्चंट बँकेसाठी रविवारी मतदान पार पडले होते. केवळ ४४ टक्के मतदान झाल्याने निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे पंढरपूरसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले होते. आज सोमवारी पंढरपूर येथील शासकीय गोदामामध्ये मतमोजणीस सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीस विरोधी पॅनलच्या कपबशीने चांगलीच आघाडी घेतली होती. परंतु दुपार नंतर ग्रमीण भागातील मतांची मोजणी सुरू झाली असता. कपबशी चिन्हास मिळालेली आघाडी पार करून भोसले पॅनलच्या विमानाने बरोबरी साधली होती.

   त्यानंतर प्रत्येक टेबलवर मतमोजणी होत असताना ही आघाडी मागे पुढे होत होती. मात्र आखेरीस भोसले प्रिणत पॅनलने १२ जागांवर विजयश्री खेचून आणला.  निकाल घोषीत करण्यात आल्यानंतर भोसले पॅनल समर्थकांनी गुलालाची मुक्त उधळण करीत मोठा जल्लोष साजरा केला.


विजयी उमेदवार
भोसले प्रणित पंढरपूर मर्चंट बँक सहकारी विका आघाडी - भगीरथ औदुंबर म्हमाणे , राजेंद्र पवनलाल फडे , विजयकुमार रामचंद्र परदेशी,  अमरजित राजाराम पाटील, नागेश अण्णासो भोसले, पांडुरंग निवृत्ती शिंदे -नाईक, शितील विद्याधर तंबोले, सोमानाथ सदाशिव डोंबे, विजयकुमार कांतीलाल कोठारी, मंजुश्री सुधीर भोसले, अदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरकर , वसंत धोंडीबा शिखरे (बिनविरोध)
   
  विरोधी पॅनल विजयी उमेदवार .......
भारत शिवदास भिंगे, सुनंदा पदम्कुमार गांधी, संजय विठल जवंजाळ

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form