विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगोत्सव उत्साहात साजरा
पंढरपूर --प्रतिनिधी
प्रतिवर्षीप्रमाणे रूढी व परंपरेनुसार मंदिरातील नित्योपचार व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात
आले आज फाल्गुन कृ.५ रविवार दि.१२/०३/ २०२३ रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे वतीने रंगपंचमी
निमित्त दुपारी ०३ वाजता कलगीचे वाजतगाजत मिरवणुक काढुन कलगीवाले यांचे मठामध्ये जावून पुजा करून मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला .
तर डफाची मिरवणुक कलगीवाले यांच्या मठापासून काळा मारुती-चौफाळा पश्चिमन्दार रुक्मिणी उत्तरव्दार (व्ही आय पी गेट)- संत नामदेव पायरी अशा मार्गाने आण्यात आली.
त्यानंतर दुपारी ०४.३० वाजता पोषाखानंतर मा. व्यवस्थापक यांचे हस्ते श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेची
पाद्यपूजा करून देवाच्या अंगावर रंग उधळण्यात आला व त्यानंतर मंदिरे समितीच्या डफाची पूजा करण्यात आली.
डफाची व रंगाची मिरवणुक वाजतगाजत, नवरंगाची उधळण करत तसेच बॅन्ड व हलगीच्या निनादात मोठया उत्साहात मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली तसेच कलगीवाले डफाचे मानकरी यांचा मंदिर समितीच्या यथोचित मानसन्मान करण्यात आला.
तसेच श्री ना वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत पांढरा पोषाख घालण्यात आला त्याची आज सांगता करण्यात आली आणि आता उद्यापासून श्री ना रंगीत पोषाख घातला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

