शेतीपंपाची वीज तोडणी बंद करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नका : अन्यथा गंभीर आंदोलन करू
पंढरपूर प्रतिनिधी ----
शेतकऱ्यांची तोडलेली वीज कनेक्शन तात्काळ जोडा , डीपी चढवा, पाणीपुरवठ्याला वीज मिळू द्या, न सांगता वसुलीच्या नावाखाली शेतीपंप बंद करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. असा महावितरणला इशारा भाजपाचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिला.
आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुका आणि पांडुरंग परिवार यांच्या वतीने विनाकारण होणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीज तोडणी बाबत आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण कार्यालयाच्या समोर जाऊन अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरत शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबवा. डीपी परत चढवा. पाणीपुरवठा कनेक्शन होऊ द्या. आटा चक्की सुरू होऊ द्या. नागरिकांना व शेतकऱ्यांना सुखकर जीवन जगू द्या. अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सरकारचे शेती पंपाची विज बंद करण्याचे कोणतेही आदेश नसताना पंढरपूर विजवितरण कंपनीच्या अधिकारी मनमानी करत शेतकर्ऱ्याचा विद्युत पुरवठा बंद केलेला आहे. यामुळे सर्व शेतकर्ऱ्याची पिके धोक्यात येत आहेत व जनावरांचा पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. या वित वितरण अधिकाऱ्याच्या आडमुट्या धोरणामुळे शेतकरी अडचणीमध्ये येत आहे.
सद्या खंडीत केलेला विद्युत पुरवठा पुर्ववत करावा व टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांकडून विज बिल भरून घ्यावे. यापुढे शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकाराचा अन्याय होवू नये यासाठी हे निवेदन देण्यात येत आहे.
तरी या निवेदनाची दखल घेवून विद्युत पुरवठा सुरळीत चालू करावा अन्यथा यापुढे भारतीय जनता पार्टी तालुका/शहर व पांडुरंग परिवार यांच्या वतिने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी ही विद्युत पुरवठा अधिकारी यांची राहिल. असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे आंदोलन युवा नेते प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. गेल्या आठवड्यापासून आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे शेतकऱ्यांकडून वारंवार महावितरण बाबत तक्रार येत आहेत शेतकरी हा पैसे बुडवणार नाही आमच्या नेत्यांची पैसे बुडवा अशी भूमिका देखील नाही पण शेतकऱ्यांना विनाकारण जर त्रास होणार असेल तर त्याबाबत आवाज उठवण्याची आमची शिकवण असल्याचे यावेळी प्रणव परिचारक म्हणाले.
याप्रसंगी पुढे बोलताना परिचारक म्हणाले , पंढरपूर तालुका शिवाय इतर तालुक्यांमध्ये अशा प्रकारची न सांगता कुठल्याही प्रकारची वीज तोडणी होत नाही. मात्र असा त्रास महावितरण करून पंढरपूर तालुक्यातच का होतो आहे. हा त्रास तात्काळ थांबवा अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. भाजपाच्या विचाराचे सरकार जरी असले , तरी पक्ष म्हणून आमच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. सरकार सरकारच्या जागी काम करेल. कार्यकर्ता पक्ष म्हणून काम करेल. असा इशाराही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना देत तात्काळ वीज जोडणी करण्याचे आवाहन केले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, कैलास खुळे सर, सुभाष मस्के, माऊली हलनवर, तानाजी वाघमोडे, लक्ष्मण धनवडे, बाळासाहेब यलमार, संतोष घोडके, सुनिल भोसले, सुजाता वग्रे, डॉ.प्राजक्ता बेनारे, स्मिता पाटील, कल्पना शिंगटे, संदिप माने, लक्ष्मण वंजारी, बादल ठाकूर, हर्षल कदम, रणजित जाधव, आबा पवार, नितीन कुसुमडे, संदिप कल्सुळे, राहूल शिंदे यांच्या सह मोठ्या संख्येने भाजपाचे व पांडुरंग परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
