तुंगत येथील युवक 22 दिवसांपासून बेपत्ता


पंढरपूर तालुका पोलिसांत हरविल्याबाबतची तक्रार दाखल : सापडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन


पंढरपूर प्रतिनिधी---
  तुंगत ता.पंढरपूर येथील रमेश बापु जाधव (वय - 32 वर्षे) हा दि.21 जानेवारी 2023 पासून राहत्या घरातुन कोणालाही काही न सांगता निघून गेला आहे. सदर घटनेबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याबाबतची तक्रार नोंद करण्यात आली आहे.
   रमेश बापु जाधव याचे लग्न झाले असून त्यास दोन मुले आहेत. शेती हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय आहे. रमेश यास मानसिक आजार असल्याने पंढरपूर येथील एका डॉक्टरकडे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवार दि.21 जानेवारी रोजी सकाळी 8 च्या सुमारास रमेशचे आई,वडील व त्याची पत्नी, मुले घरात असताना रमेश राहत्या घरातुन निघून गेला आहे. घरातुन जाताना कोणासही काही न सांगता रमेश घरातुन निघून गेला आहे. सायंकाळी घरी परत न आल्याने  गावात, नातेवाईक, पंढरपूर शहरातील मठ व धर्माशाळेत शोधाशोध करण्यात आली. रमेश कुठेच आढळुन न आल्याने त्याचे वडील बापु ज्ञानोबा जाधव यांनी पंढरपूर तालुका पोलिसांत रमेश हरविला असल्याबाबत 6 फेब्रुवारी 2023 रोजी तक्रार नोंदविली आहे.
       रमेशचा रंग सावळा, उंची पाच फुट, अंगात काळ्या हिरव्या रंगाचा चौकडा शर्ट, निळया रंगाची जिन्स, नाक पसरट, चेहरा गोल, डोळे मोठे, केस काळे, उजव्या हाताला गाठी असून तो मराठी भाषा बोलत असून कुठे आढळून आल्यास पंढरपूर तालुका पोलिसांना किंवा वडिलांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form