या शासकीय सोहळ्यात एकूण ३३ पथकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट, विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प, पालवी तसेच विविध विद्यालयाच्या विध्यार्थी-विद्यार्थ्यीनी यांच्या संचलनाचे श्री. गुरव यांनी निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली.
पंढरपूर -प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यात एकूण ३३ पथकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट, विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प, पालवी तसेच विविध विद्यालयाच्या विध्यार्थी-विद्यार्थ्यीनी यांच्या संचलनाचे श्री. गुरव यांनी निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली.
शासकीय ध्वजारोहण समारंभास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, अपर तहसिलदार समाधान घुटूकडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरिक्षक अरुण फुगे, नायब तहसिलदार पी.के.कोळी, शितल कन्हेरे यांच्यासह स्वांतत्र्यसैनिक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, तसेच मान्यवर उपस्थित होते.यावेळी संविधान उद्देशिकाचे वाचन करुन उपस्थितांना ध्वज प्रतिज्ञा देण्यात आली.
तसेच पोलीस दलाच्या वतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी पथ विक्रत्येतांना प्रोत्सहन मिळण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतर्गंत पंढरपूर नगपालिकेच्या वतीने सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेतून पथविक्रत्येत्यांना परिचय बोर्ड व पत्राचे वाटप नगरपालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी गजानन गुरव व मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या हस्ते करण्यात आले.